कोणी कितीही अडचणी आणल्या तरी निळवंडेचे पाणी येणारच : आ.थोरात

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम रात्रोदिवस सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे.

कार्यक्षेत्रात ६ एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्‍यातील सहकारी संस्था,कारखाना यामुळे तालुक्‍यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे बातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२- २३ गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ.सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतर्सिह देशमुख, लहानु गुंजाळ, आर.बी. राहणे,

मिलिंद कानवडे, सोमेश्‍वर दिवटे, व्हा.चेअरमन संतोष हासे, इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, होशीराम सोनवणे, अर्चनाताई बालोडे, निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर, घुलेवाडीच्या सरपंच निर्मलाताई राऊत, नवनाथ आरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, कारखान्याने यावर्षी अनेक अडचणीवर मात करून १० लाख मेट्रिक टनाचे वर वशस्वी गाळप केले आहे. निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून आपण पूर्ण केले. माजी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले, बिनचूक आणि निर्मिग्नमपणे कारखान्याचा हंगाम पार पाडला आहे.

यामध्ये कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनत्रीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आ.सत्यजित तांबे म्हणाले,

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरू असून उपपदार्थ निर्मिती बरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये साखर कारखान्याला मोठी संधी आहे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. व्हा.चे अरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe