नारायण राणे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही – आ. रोहित पवार

Published on -

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-‘नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत जी टीका केली ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

असे प्रतिपादन कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार केले आहे. तसेच राणेँविषयी बोलताना पवार म्हणाले कि, भाजपचे नेते खासदार राणे जे बोलत आहेत ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे की भाजपच्यावतीने बोलत आहेत?

विरोधक सरकार पडावं याकडेच जास्त लक्ष देत आहेत. तसेच पुढे बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात महापोर्टलमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

तसेच महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे मध्य प्रदेशमधील व्यापमशी लागेबांधे असल्याचा आरोप केला. तसेच या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. त्यामध्ये राजकारण आणू नये, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं. नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे हे जसं बोलतायत त्यावरून यांना व्हिजन नसल्याचं दिसतंय, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News