एक – दोन नव्हे तर चक्क तीन बिबट्यांचे दर्शन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही.

यातच आता पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील निमज येथील सरपंच डोंगरे यांच्या उसाच्या शेतात मंगळवारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहे.

निमज परिसरात उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन बछडे आढळले. ही माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली.

वनरक्षक सी. डी. कासार घटनास्थळी दाखल झाले.बछड्यांना शेजारच्या उसाच्या शेतात मादीच्या सहवासात सोडण्यात आले. अन्यथा मादीने धुमाकूळ घातला असता.

मागील आठवड्यात वाहनाची धडक बसून या परिसरात बिबट्या ठार झाला होता. या परिसरात बिबट्यांचा रहिवास मोठ्या प्रमाणावर आहे.

उसाचे क्षेत्रही जास्त असल्याने त्यांना लपण्यास जागा मिळते. दरम्यान, या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी येथे पिंजरे लावावेत, अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News