‘दांडी बहाद्दर’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नोटिसा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून 15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे.

दरम्यान पारनेर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये आज अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी अनुपस्थित राहिलेल्या 112 कर्मचार्‍यांना नोटिसा पाठवून म्हणणे सादर करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज पारनेर तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यास 45 निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्यासह एकूण 112 अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी या 112 अनुपस्थित कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment