अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दररोज कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी देखील जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा चांगला असल्याने नगरकरांसाठी हि एक दिलासादायक बाब आहे.
दरम्यान कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्याचे आरथक कंबरडे मोडले असून त्याला सावरण्यासाठी मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे.
तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊनरुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved