आता अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्याची दहशत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नुकतेच शेवगाव तालुक्यातील वडुले बु. येथील गायकवाड वस्ती गणपती मंदिर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. शुक्रवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान अशोक कापरे यांच्या घरासमोर तुरीच्या शेतात बिबट्या आढळला.

याची माहिती कापरे यांनी गावातील मित्र व गायकवाड वस्तीवरील सर्व लोकांना फोन करून दिली. त्यानंतर घटनास्थळी सहकाऱ्यासह सागर सागडे व पोपटराव पाखरे यांनी त्यांच्या वस्तीवर धाव घेतली.

रात्री वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील याची माहिती घेतली. गावातील लोकांना बिबट्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.

शनिवारी वन विभागाचे पथक आले. त्या पथकाने बिबट्याच्या पाऊल खुणा असल्याचे स्पष्ट केले. परीसरात बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News