आता सरकारी खर्चाने करता येणार साईबाबा, शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचे दर्शन ….! काय आहे योजना ?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा यासह इतर देखील प्रमुख मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. आयुष्यात एकदा तरी या तीर्थक्षेत्राला जाऊन येण्याचे अनेकांचे स्वप्न असते.

आपल्या आयुष्यातील पुण्य मिळवण्यासाठी या तीर्थक्षेत्राला जाण्याची अनेकांची तर शेवटची इच्छा असते, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हि तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.

मात्र आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आल्या आहेत.

याचवेळी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची देखील घोषणा केली होती. या योजनेमुळे राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्या व्यक्तींना देवदर्शन करता येणार आहे.

नुकतेच या योजनेचे शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले असून जिल्ह्यातील चार तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शिर्डीचे साईबाबा मंदिर, शनी शिंगणापूरचे शनी मंदिर, पाथर्डी तालुक्यातील भगवानगड, सिद्धटेकचे सिद्धविनायक मंदिर यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातील देव दर्शनासाठी जाणे शक्य नाही त्यांना निदान जिल्ह्यातील हि चार तीर्थस्थळांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारे भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या योजनेमध्ये पात्र व्यक्तींना देवदर्शन करता येणार आहे.

यामध्ये प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. यामध्ये देशातील ७३ तीर्थस्थळे तर राज्यातील ६४ तर जिल्ह्यातील ४ तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेतील पात्र व्यक्तीला एकदाच लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार ठेवण्यात आहे.यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe