आता उपमुख्यमंत्री दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ३० व ३१ जानेवारीला अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राहुरी व श्रीगोंदा येथे अजित पवार यांच्या नियोजित दौरा आहे. श्रीगोंदा नगर परिषदेच्या विविध प्रकारच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तर मुख्यमंत्री सौरकृषी योजनेचा पवार यांच्या हस्ते एकात्मिक ऊर्जा विकास योजना- १ अंतर्गत ३३/११ के व्ही उपकेंद्र राहुरी खु. येथे ५ एम व्ही ए चा ट्रान्सफॉर्मर बसवून क्षमता वाढ करणे कामाचे उदघाटन / लोकार्पण.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत राहुरी मतदारसंघातील विविध वांबोरी,बाभुळगाव, आरडगाव, गणेगाव, ताहाराबाद ५सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे खलबते रंगण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नगर दौरा होत असल्याने या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe