अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- नगर शहरातील वाढते अतिक्रमण, खड्डे, नादुरुस्त रस्ते, जड वाहतूक अशा विविध नागरी समस्यांमुळे नगरकरांचे मोठे हाल होते आहे.
मात्र या प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिव राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर शहरात असून सकाळी पोलीस मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला जात असताना लालटाकी परिसरात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
शहरातील विविध प्रश्नांवर पालकमंत्री यांचे दुर्लक्ष म्हणून निषेध नोंदवला आहे. शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्यासह शिव राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved