नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आलीय अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

ही घटना संगमनेर शहरातील इंदिरानगर येथे घडली आहे, एका नराधमाने अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत त्याला धमकी दिली.

या मुलास त्रास होऊ लागल्यानंतर त्याने आपल्या आईस ही माहिती दिली आणि घडलेला सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अलताफ उर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, र्टी फस्टच्या नावाखाली त्याने मद्य प्राशन केले आणि नवे वर्ष लागण्यापुर्वीच या नराधमाने झोपलेल्या मुलाचे कपडे काढले.

यावेळी बालकाने विरोध केला असता त्याला शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा नराधम येथेच थांबला नाही तर त्याने पहाटे व दुसर्‍या दिवशी सकाळी देखील या बालकावर अत्याचार केले.

दरम्यान, सकाळी या मुलास प्रचंड त्रास होऊ लागल्यानंतर त्याने आपल्या आईस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे हा प्रकार वास्तव असल्याचे समोर आले.

या मुलावर जो काही अत्याचार झाला होता. तो जर कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन अशी धमकी आरोपीने दिली होती. पीडित मुलाने सर्व प्रकार पोलिसांपुढे कथन केला.

त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या फिर्यादीनुसार आरोपी अलताफ उर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe