अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अधिकारी/कर्मचार्यांनी आज अकराव्या दिवशी सामूहिक रजा घेऊन आंदोलन करण्यात आले.
महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ सकाळी कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून सामाजिक अंतर राखत एकत्र जमले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच आपल्या मागण्यांचे निवदेन कुलसचिव मोहन वाघ आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांना दिले. यावेळी आंदोलकांनी आक्रमकता घेत जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहिल असे जाहीर केले. दरम्यान काम बंद आंदोलनात शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणुन विद्यापीठाने बियाणे विक्री सुरु ठेवली आहे.
कार्याध्यक्ष डॉ. महावीरसिंग चौहान म्हणतात, सर्व अकृषी विद्यापीठाना सातवा वेतन आयोग व आश्वाशीत प्रगती योजना गेल्या वर्षीच लागू झालेला असून कृषी विद्यापीठाना का वगळण्यात आले? कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दिवाळीपूर्वी दूर करण्यात यावा व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनामध्ये डॉ. उत्तम कदम, डॉ. सोपान मोरे, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. रवि आंधळे, डॉ. विजय पाटील, डॉ. स्वाती शिंदे, मच्छिंद्र बाचकर, एकनाथ बांगर, पी.टी. कुसळकर आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved