अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- बनावट अधार कार्ड तसेच बनावट व्यक्ती उभ्या करून सुप्यातील सव्वादोन गुंठे प्लॉटची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील एकास पारनेर पोलिसांनी अखेर अटक केली.
या रॅकेटमधील आणखी दोघा मास्टर माईंडसह चार आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात रूपेश शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. दुसरा आरोपी अजित सोनवणे हा आजारी असल्याने पोलिसांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सूचनेनुसार पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दीड महिन्यानंतर या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. हंगे येथील २ हेक्टर ४० आर जमिनीची बनावट दस्तऐवज तसेच बनावट व्यक्तींच्या आधारे विक्री करून
अशाच प्रकारे फसणूक झाल्याचा दुसरा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सतर्क होत सुपे प्रकरणातील एकास जेरबंद केले. कामरगाव येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा विश्वास संपादन करून गुरूजींना या प्रकरणात फसवणारा भामटा या प्रकरणी फरार आहे.
सुपे येथील नीरामय हॉस्पिटलजवळील सव्वादोन गुंठ्ठ्यांचा रहिवासी प्लॉट पत्नी आजारी असल्याची बतावणी करीत भामट्यांनी कमी भावात विक्री केला होता.
बनावट आधार कार्ड वैध मानून दुय्यम निबंधकांनी दस्त नोंदणी केली होती. हंगे येथील दोन हेक्टर ४० आर जमीनीच्या विक्रीतही बनावट आधार कार्ड तसेच पॅनकार्डची पडताळणी करण्यात आली नाही. त्यामुळे दुय्यम निबंधकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved