एटीएम मध्ये हातचलाखीने एकास सव्वा लाखास लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा एसटी स्टँड शेजारील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये एका अज्ञात तरुणाने ३८ वर्षीय इसमाला तब्बल सव्वा लाखांना गंडा घातला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एटीएमचे मिनी स्टेटमेंट काढून देतो म्हणून, तुळशीराम लोंढे (रा. चांडगाव. ता. श्रीगोंदा) या इसमाकडून एका अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड घेऊन, विश्वासाने पिन नंबर घेतला आणि एटीएमचे स्टेटमेंट काढून दिले.

मात्र, एटीएम परत करताना दुसरे एटीएम देऊन, नमूद एटीएम मधून एक लाख वीस हजार रुपये काढून घेतले असल्याची घटना श्रीगोंद्यातील SBI च्या एटीएम मध्ये घडली आहे.

याबाबत लोंढे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा पोलीस नाईक खारतोडे हे तपास करीत आहेत. सदर गुन्हा पोलिस सहाय्यक फौजदार नवले यांनी दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment