अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने लावला आहे. नुकतेच शहरातून दुचाक्यांची चोरी करणार्या दोघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पथकासह दुचाक्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना नगर- मनमाड रोडवरील सावेडी परिसरात दोघे संशयित इसम दुचाकीवर फिरत असताना पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबून त्यांच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरली असल्याची त्यांनी सांगितले.
त्यांच्याकडून शहरातील आणखी दुचाक्यां चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करीत आहे. दुचाकी चोरी प्रकरणी इरफान जावेद पठाण (वय 36),
वसीम मुसा शेख (वय 32 दोघे रा. बाराईमाम कोठला, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची एक दुचाकी हस्तगत केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved