अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राज्यात गुटखा बंदी असूनही एकाने गुटका व पान मसाल्याचा साठा केल्याने पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संजय बाबूलाल लुकंड वय ४५ अभंग मळा संगमनेर असे या संशयितांचे नाव आहे.
त्याच्याकडून एक लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री व साठा विरोधात मोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांना लुकंड यांच्या राहत्या घराच्या शेजारी गोदामात गुटखा व पानमसाला साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी शनिवारी दुपारी या गोदामावर छापा टाकत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला आहे. संगमनेर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकण्याची मोहीम हाती घेतल्याने अवैध धंद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved