एकाची पाण्याची टाकीत तर दुसऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

 संगमनेर :  शहरातील श्रीरामनगर येथील सूरज चंद्रकांत अभंग , वय २३ या तरुणाने घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली .

तर घोडेकर मळ्यातही संदीप प्रभाकर कांबळे, वय ३२ याने राहत्या घरातील सिलिंगच्या हकला साडी बांधून गळफास घऊन आत्महत्या कल्याचा घटना बुधवार दि. १८ फेब्रुवारी ते गुरुवार दि . १९ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील श्रीरामनगर या ठिकाणी सुरज चंद्रकांत अभंग हा तरुण आपल्या आई – वडिलांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सूरज याने घरात कोणी नसताना आतमधून कडी लावून घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत उभी मारुन आत्महत्या केली.

दुपारी त्याचे आई – वडिल घरी आले असता घर बंद दिसले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला , पण आतून कडी होती. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला आणि वर जाऊन पाण्याच्या टाकीत पाहिले असता सूरजने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दुसऱ्या घटनेत संदीप प्रभाकर कांबळे हा तरुण आपल्या कुटुंबासोबत घोडेकर मळा या ठिकाणी रहाता होता . बुधवारी  रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान त्याने घरातील सिलिंगच्या हुकला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली.

या दोन्ही घटनांमुळे अभंग व कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व संतोष कांबळे यांनी दिलेल्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment