अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :भ्रष्टाचाराचे प्रमाण आणि आर्थिक गैरकारभाराचे प्रकार अनेक आर्थिक संस्थांमध्ये उघडकीस येत आहेत. असाच एक गैरकारभाराचा प्रकार सहकार महर्षी काष्टी सोसायटीमध्ये झाल्याचा आरोप होत आहे.
एका माजी व्यवस्थापकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या बोगस सह्या करून १ कोटी ८० लाखांच्या बोजाची नोंद शेतीक्षेत्रावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तशी तक्रार माजी व्यवस्थापक जालिंदर माणिकराव पाचपुते यांनी केली आहे. काष्टी येथील भगवानराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वादोनशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या
सहकार महर्षी काष्टी संस्थेत माजी व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी अध्यक्ष विठोबा पाचपुते, सचिव बुलाखे यांच्यासह सतीश रमेश पाचपुते,
गणेश मच्छिंद्र पाचपुते व ज्ञानेश्वर बाळासाहेब इंगवले यांनी बोगस कागदपत्रांसाठी सह्या केल्याचे म्हटले आहे. माजी व्यवस्थापक जालिंदर पाचपुते ६० लाख, त्यांचा भाऊ मच्छिंद्र पाचपुते ६० लाख,
श्रध्दा जालिंदर पाचपुते व मीरा मच्छिंद्र पाचपुते यांच्या नावे प्रत्येकी ३० लाख असा एकूण १ कोटी ८० लाखांचा बोजा सातबारा उताऱ्यावर खोट्या सह्या करुन कामगार तलाठी यांना हाताशी धरुन नोंदवला.
या प्रकरणी कामगार तलाठी सुपेकर यांनी नियमाप्रमाणे नोटीस देणे बंधनकारक असताना राजकीय दबावापोटी दिल्या नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews