अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-नेवासा तालुक्यात एकाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली तर दुसऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की,
राहुरी तालुक्यातील पानेगाव परिसरात राहणारा तरुण सुनील ज्ञानदेव घोलप, वय ३६ याला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी गंभीर स्थितीत सुनील ज्ञानदेव घोलप या तरुणास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
तेथील डॉक्टरांनी तपासले असता सुनील ज्ञानदेव घोलप या तरुणाचा उपचारापृर्वीच मृत्यू झालेला होता. राहूरी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी खबर सोनई पोलिसात दिल्यावरुन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
सपोनि कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ लबडे हे सुनील घोलप या तरुणास नेमका कोठे? कसा? विजेचा शॉक बसला? त्याचा मृत्यू कसा झाला? याचा पुढील तपास करीत आहे.
सुनील घोलप याच्या अकस्मात मृत्यूमुळे पानेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसऱ्या घटनेत नेवासा तालुक्यातील सोनई येथे राहणारा तरुण दत्तात्रय जगन फुलारे याने त्याच्या रहात्या घरातच पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली,
दत्तात्रय फुलारे याला तातडीने नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र तो उपचारापूर्वीच मयत झालेला होता. याप्रकरणी अशोक पांडुरंग शिंदे, रा. सोनई, ता. नेवासा यांनी सोनई पोलिसात खबर दिल्यावरुन
अकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला असून दत्ताजय फुलारे या तरुणाने नेमका कसा? कोणत्या वेळेला घरातील पंख्याला गळफास घेतला? याचा पुढील तपास हेको आव्हाड हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved