अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गारदा नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तो बेपत्ता झाला असल्याची खबर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रुग्णवाहिका चालक अमित साहेबराव खोकले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
खोकले मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येवला येथे एका दुसऱ्या रुग्णास सोडून परत कोपरगावकडे येत असताना त्यांना येसगावनजिक गारदा नदीवरील पुलावर काही ग्रामस्थांची गर्दी आढळून आली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पहिले असता त्या ठिकणी त्यांना पुलाच्या पूर्व बाजूस एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले.
त्याच्या डोक्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठी जखम झालेली होती. त्या इसमाचे वय साधारण ४५ वर्षाचे असावे. तो पादचारी मार्गाने येवल्याकडून कोपरगावकडे येत असताना ही दुर्घटना झाली होती. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला होता. खोकले यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने त्या मृतास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com