अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे, यामुळे दरदिवशी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. यातच पुन्हा एकदा अशाच एका अपघातात एक जण ठार झाला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ मोटारसायकल व चारचाकी वाहनाची धडक होऊन मोटारसायकल चालक ठार झाला आहे.
तर धडक देणारा चारचाकी वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला आहे.याबाबत सुपा पोलिस स्टेशनला किशोर तुकाराम बर्डे (रा.पदपुरवाडी, ता. जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान यामध्ये फिर्यादीने म्हटले आहे, की मी व माझा सहकारी मी मयत आंतुश दशरथ चव्हाण (रा.न्हावरा, ता.शिरुर, जिल्हा पुणे)
आम्ही दोघे मोटार सायकल वरुन शनिवारी सायंकाळी नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावरील सुपा टोलनाका वाघुंडे गावच्या शिवारात अज्ञात वाहनांनी समोरासमोर धडक दिली. व यात माझा सहकारी जे गाडी चालवत होते ते ठार झाले व मी ही जखमी झालो व तो चारचकी वाहन चालक तेथुन गाडीसह पळून गेला.
सुपा पोलिसांनी फिर्याद किशोर तुकाराम बर्डे यांच्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. जे. साबळे हे करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved