अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे.
दरम्यान हि घटना जामखेड तालुक्यातील कर्डूवाडी टेंभूरणी रोडवर तांबवे गावच्या शिवारात घडली आहे. या अपघातात जामखेड तालुक्यातील हळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा जागीच मृत्यू झाला.
तर उत्तम तात्याबा ढवळे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर टेंभूरणी येथील पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आजीनाथ खोटे व उत्तम ढवळे हे दोघे दुचाकीहून हळगावाहून पंढरपूर येथे औषध आणण्यासाठी गेले होते.
औषधे घेऊन दोघे सोलापूर पुणे हायवेवरून गावी परतत असतना करमाळा ब्रिज खालून जाण्याऐवजी चुकून कर्डू वाडी ब्रिज खालून कर्डूवाडी रोड बरेच पुढे गेले असता त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले.
पुन्हा गाडी वळवून ते गावाकडे निघाले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये अजीनाथ खोटे याच्या जागीच मृत्यू झाला. तर उत्तम ढवळे हे गंभीर जखमी झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved