अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर-औरंगाबाद रस्त्यावर घोडेगाव शिवारात टेम्पो आणि पिकअप यांचा अपघात होऊन 1 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत.
तुषार शाम कोष्टी (वय 33) असे मृत्यू झाल्याचे नाव असून मनाल, सृष्टी व भाग्यवती असे जखमी झालेल्याची नावे असल्याचे समजते. हा अपघात रविवारी दुपारी 12 वाजता घडली आहे.
याबाबत नितीन शांताराम कोष्टी (वय 41) रा.लावावाडी ता.जि. नागपूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आप्पाराव रामचंद्र नळनर (रा.रामतीरथ ता.लोहा,जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्ह नोंदविला आहे.
नितीन शांताराम कोष्टी हे त्यांची बोलेरो पीकअप (एमएच 31 एफसी 4742) मधून चुलत भाऊ तुषार, आई भाग्यवती, मुलगी सृष्टी व मुलगा मनाल यांना त्यांच्या शिक्षणासाठी कल्याण येथे सोडण्यासाठी जात होते.
याच दरम्यान एलपीटी टेम्पो (एमएच 14 ईएम 5686) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून गाडीस पाठीमागून जोराची धडक बसली.
तो माझे चुलत भाऊ तुषार शाम कोष्टी (वय 33) याचे मरणास तसेच मुलगा मनाल, मुलगी सृष्टी व आई भाग्यवती यांचे कमी अधिक दुखापतीस व दोन्ही गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved