कार – दुचाकीच्या अपघातात एक ठार दोन जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यात अपघातांचे सत्र काही केल्या थांबेना… दरदिवशी होणाऱ्या या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नुकताच संगमनेर तालुक्यात एक अपघात घडल्याची घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील चिखली येथे कोल्हार घोटी राज्यमहामार्गावर स्विफ्ट कार आणि दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हा अपघात आज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील परिसरातून कोल्हार घोटी महामार्गावर दुचाकीस्वार हा अकोलेच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला.

या दुचाकीवार तिघे जण बसलेले होते. यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात बाबासाहेब आव्हाड (वय ३५ रा. पिंपळगाव कोन्झिरा) यांचा मृत्यू झाला तर निलेश खर्डे (वय २४) व किरण तांबे (वय २६) हे दोघे जण जखमी झाले आहेत. या दोघांवर तांबे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment