सोफ्यावर ठेवलेल्या पिशवीतून एक लाख रुपयांची रोकड लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका सोन्याच्या दुकानातून महिला ग्राहकाची पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली.

या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मुख्य बाजारपेठेत चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे.

शनिवारी मंगल गिरी (रा. आदरुड, ता. जि. उस्मानाबाद) या आपल्या मुलासमवेत भाऊबीजेनिमित्त आष्टी तालुक्यात जात असताना चिंतामणी ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी थांबल्या होत्या.

यावेळी गिरी यांचा मुलगा मयूर हा सोने खरेदी करत आसताना मंगल गिरी या दुकानातील सोफ्यावर पैशाची पिशवी घेवून बसल्या होत्या.

मयूर याने त्यांना सोने पाहण्यासाठी काऊंटरजवळ बोलावले असता, गडबडीत त्यांनी पैशाची पिशवी तशीच सोफ्यावर ठेवली व त्या सोने पाहण्यासाठी काउंटरजवळ गेल्या.

मात्र पुन्हा सोफ्याजवळ आल्या असता, त्यांना पिशवीची चेन उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पिशवी उचकली असता, त्यात ठेवलेले एक लाख रुपये नसल्याचे आढळून आले.

दुकानातील गर्दीचा फायदा घेवून पैसे चोरीस गेल्याची घटना उघडकीस येताच दुकानात खळबळ उडाली. दरम्यान, मंगल गिरी यांनी शनिवारी जामखेड पोलीस ठाण्यात जावून याबाबत फिर्याद दिली.

याप्रकरणी जामखेड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment