बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या चिमुकल्याच्या गोरे कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच दहा लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील सादतपूर हर्षल राहुल गोरे याच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात हर्षल मयत झाला. त्यानंतर राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी गोरे कुटुंबियांच्या घरी भेट देवून सांत्वन केले होते.

नरभक्षक बिबट्याला लावकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश त्यांनी वनविभागाला दिले होते. ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत शासकीय स्थायी आदेशाप्रमाणे तात्काळ दहा लाखाची मदत असून पुढील ५ वर्षासाठी १० लाखाची एफ.डी. करण्यात येणार आहे.

त्यानंतर १० वर्षांसाठी ५ लाखाची एफ.डी. वनविभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी एकुण २५ लाख रुपयांची मदत गोरे कुटुंबीयांना होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने यांनी दिली.

सध्या १० लाखाचा धनादेश सुपूर्त करताना संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी तसेच प्राणीमित्र विकास म्हस्के, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिद्र थेटे, प्रवरा बँकेचे संचालक बबनराव काळे, पोलीस पाटील सुनिल मगर, संजय मगर, दगडू शिंदे, ज्ञानदेव गुंजाळ, रमेशराव मगर, गोरक्षनाथ मगर, दिलीप मगर, विजय डेंगळे, रमेश कडू, अजय शिंदे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe