Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५), व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०), या वृद्ध दाम्पत्याला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा पाथर्डीच्या निर्वाह दिला आहे.
सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५) व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०) या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या अपत्याविरुद्ध निर्वाह अर्ज दाखल केला होता.
पाथर्डीच्या निर्वाह न्यायधिकरणाचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी तो अंशतः मंजूर करून नुकताच हा आदेश दिला. हुंडेकरी दाम्पत्याचा एक मुलगा आणि चार विवाहित मुली सांभाळ करीत नाहीत.
त्यांना नियमित वैद्यकीय उपचारांसाठी खर्च लागतो. हे दाम्पत्य स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असून, अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचारांसाठी दरमहा ४० हजार रुपये या मुला-मुलींकडून मिळावेत, अशी कैफियत त्यांनी निर्वाह न्यायाधिकरणाकडे मांडली होती.
एक मुलगा आणि चार मुली यांनी प्रत्येकी दोन हजार, असे दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी मते यांनी दिला आहे…