चंदनाच्या झाडांची चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- चंदनाचे लाकूड मौल्यवान असल्याने या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामळे अनेकजण या लाकडाची चोरट्या मार्गाने तस्करी करतात.

मात्र श्रीगोंद्यात चंदनाचे लाकूड कापत असतानाच एकाला रंगेहाथ पकडले. तालुक्यातील बेलवंडी परिसरात भोसले वस्तीवर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास चंदनाचे झाड कापत असताना परिसरातील शेतकऱ्यांनी व बेलवंडी पोलिसानी एकाला रंगेहाथ पकडले तर इतर ५ जण पळून गेले.

आरोपींकडून एक करवत, कुदळ, कुऱ्हाड चारचाकी अल्टो गाडी सह २० किलो चंदनाची लाकडे ताब्यात घेतली आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेलवंडी परिसरात नितीन भोसले यांच्या उसाच्या कडेला बांधावर असलेली चंदनाची झाडे रात्री ३ वाजण्याच्या सुमारास संजय गंगाधर माळी, शिवाजी साहेबराव मोरे, संदीप कैलास मोरे, सतिश संजय माळी,

राहुल उर्फ सोनू संजय मांजरे,अरुण शिंदे (रा.पाचेगाव ता.नेवासा) हे सहाजण चोरीच्या उद्देशाने कापत असल्याचे लक्षात आल्याने नितीन भोसले यांनी शेजाऱ्यांना फोन वरून बोलावत पोलिसांना फोन करत चोरांकडे पळत जाऊन त्यातील संजय गंगाधर माळी याला रंगेहाथ पकडले व बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

यातील पाच चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पकडलेल्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेउन त्यांच्याकडून त्यांच्याकडून झाड कापण्याची करवत,

कुदळ, कुऱ्हाड, ४० हजार रुपयांचे २० किलो चंदनचे लाकडाचे तुकडे, ६० हजार रुपये किमतीची चारचाकी अल्टो गाडी ताब्यात घेतली. नितीन भोसले यांच्या फिर्यादी वरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe