अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोरोना माहामारी रोगाच्या संकटाला तोंड देत पाथर्डी तालुक्यातील मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस परिसरात खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीस वेग आला असून, मजुरांची टंचाई जाणवत आहे.
मागील वर्षी कांद्याचे दर २० रुपयांपर्यंत गेल्याने यावर्षी देखील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. मढी येथे सुमारे २०० हेक्टर हून अधिक कांदा लागवड पूर्ण झाली.
सप्टेबर अखेर १०० हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. मढी गाव खरीप हंगामातील लाल कांदा (नाशीक) पिकासाठी नगर जिल्ह्यात अग्रेसर असून
दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथे लाल कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस, निवडुंगे व परिसरात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.
कांदा लागवडीसाठी जून ते जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर व विकतचे पाणी घेत रोपवाटिका तयार केल्या, तर काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे खरेदी करून
लागवड करणे पसंत केले आहे. रोपवाटिकांचे दरही यंदा अधिक असून, अधिक पैसे देऊन नाही कांदा रोप मिळणेही कठीण झाले आहे. तसेच मजुरीही वाढलेली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved