अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : लोकरंग ऑनलाईन आषाढी वारी या परीक्षेला महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, निसर्ग वादळ आणि इतर काही तांत्रिक अडचणीमुळे आता या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ५ दिवस म्हणजे दि. १० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पालकांनी केलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ दिलेली असून वेळेत परीक्षा शुल्क भरून आपले अर्ज पाल्य व पालकांनी तातडीने भरावेत. यापुढे अधिकची मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती परीक्षा लोकरंग फाउंडेशन आणि युवक प्रबोधन समिती यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पालकांनी या परीक्षेसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, ऑनलाईन फॉर्म भरने आणि परीक्षा शुल्क भरण्यात अडचणी येत असल्याने अनेकांचे फॉर्म भरणे राहून गेले आहे.
त्यात चक्रीवादळाने वीज व मोबाइल रेंजचा प्रोब्लेम झालेला आहे. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा अर्ज भरण्यासाठी https://www.payumoney.com/events/#/buyTickets/ashadhi_wari_exam या लिंकमध्ये काही समस्या जाणवल्या तर 9422215658 या मोबाइल नंबरवर गुगल पे किंवा पेटीएम याद्वारे परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपूर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर व ईमेल ही माहिती त्याच मोबाइल नंबरला व्हाटस्अॅपद्वारे पाठवून देऊनही लोकरंग आषाढी वारी या परीक्षेसाठी आपण नावनोंदणी करू शकता.
त्यांनी म्हटले आहे की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होत असलेल्या या परीक्षेत कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या इमेल व व्हाट्सएप नंबरवर या परीक्षेसाठीची इबुक पुस्तके, व्हिडीओ आणि इतर अध्ययन सामुग्री दि. ११ व १२ जून २०२० रोजी पाठवली जाईल.
तसेच https://www.facebook.com/LokrangARDC या फेसबुक पेजवर याबाबतच्या सर्व सूचना आणि अध्ययन सामुग्रीची लिस्ट आपण पाहू शकता. त्यासाठी आताच हे पेज लाईक आणि फॉलो करून ठेवा. दि. १० जून रोजी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण हा परीक्षा अर्ज भरू शकता. आषाढी एकादशी झाली की गुरुपौर्णिमेच्या दिवशी (रविवार, दि. ५ जुलै २०२०) रोजी दुपारी (१२ ते २ वाजेपर्यंत) १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक गटात सर्वाधिक गुण मिळवलेल्या १५ विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील. तसेच सहभागी होऊन किमान ५० % गुणांसह उत्तीर्ण झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
परीक्षेचे गट :
1. पहिली-दुसरी
2. तिसरी-पाचवी
3. सहावी-आठवी
बक्षिसांचे स्वरूप (प्रत्येक गटासाठी स्वतंत्र)
पाहिले बक्षीस : पुस्तक संच (₹ 1000/-)
दुसरे बक्षीस : पुस्तक संच (₹ 700/-)
तिसरे बक्षीस : पुस्तक संच (₹ 500/-)
12 जणांना उत्तेजनार्थ बक्षीस : पुस्तक संच (₹ 300/-)
उत्तीर्ण (किमान 50 टक्के) झालेल्या सर्वांना पार्टीसिपेशन सर्टिफिकेट
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews