आमदार आशुतोष काळे म्हणाले तरच कोरोनावर नियंत्रण…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो.

त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. कांडेकर, गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे,

प्रतिभा शिलेदार, संतोष चवंडके, अजीज शेख, डॉ. अजय गर्जे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. वैशाली आव्हाड, रमेश गवळी, प्रशांत वाबळे, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे,

नवाज कुरेशी, संदीप कपिले, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, दिनेश खरे, रावसाहेब साठे, अॅड. मनोज कडू, नारायण लांडगे, ए. जी. लोंगाणी, मनमोहन लोंगाणी, पप्पूशेठ लोंगाणी, रवींद्र देवरे, डॉ. गायत्री काडेकर, राजेंद्र फुलपगर आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment