सेवाभावी कार्यानेच कोरोनाच्या संकटातून समाज सावरणार -डॉ.गिरीश कुलकर्णी

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना सामाजिक संस्थांना देखील या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शरद पवार विचार मंचच्या वतीने स्नेहालय संचलित निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राममध्ये अनामप्रेमचे दिव्यांग व स्नेहालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्न-धान्याची मदत करण्यात आली.

शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांनी स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्याकडे सदर मदत सुपुर्द केली. यावेळी विचार मंचचे आयान सय्यद, अमोल कांबळे, अर्जुन बडेकर, मोहन कड, कॅप्टन शकील सय्यद,

हाजिक सय्यद, मुजीर सय्यद, शहाब सय्यद, स्नेहालयाचे विष्णू वारकरी, स्नेहा राजे, रामेश्‍वर फटांगरे, अजीत कुलकर्णी, अजय वाबळे, वैजनाथ लोहार आदी उपस्थित होते. शरद पवार विचार मंचच्या वतीने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे कार्य चालू आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाशी जोडली गेलेली ही संघटना असून, मागील दहा वर्षापासून ही संस्था स्नेहालयास विविध प्रकारच्या माध्यमातून मदत करीत आहे. या कोरोनाच्या संकटकाळात या संस्थेने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. अशा सेवाभावी कार्यानेच कोरोनाच्या संकटातून समाज सावरणार असून,

माणुसकी जीवंत राहणार असल्याची भावना डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी स्नेहालयाच्या वतीने अल्ताफ सय्यद यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. अल्ताफ सय्यद म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेक कामगारांचा रोजगार बुडाला आहे.

तर हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली तर वंचित व दुर्बल घटकांना आधार देणार्‍या सामाजिक संस्थेपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्नेहालय व अनामप्रेममध्ये गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो. या उपक्रमाद्वारे अशा सामाजिक संस्थांना मदतीचा हात देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment