अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर, श्रीरामपूर हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले.
त्यानंतर कर्जत तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कर्जतमधील व्यापार्यांच्यावतीने कर्जत शहरातील सर्व दुकाने व शासकीय कार्यालये बंद ठेवावेत,
अशी मागणी करण्यात आली होती. यावर बोलताना प्रांताधिकारी अर्चना नष्टे म्हणाल्या की, दुकाने बंद ठेऊन कोरोना रोखता येणार नाही तर प्रत्येकाने शिस्त व शासनाचे नियम पाळले तरच कोरोना रोखता येणार आहे.
यामुळे बंदला आमचा पाठिंबा नाही.’ दुकाने बंद ठेवून किवा लॉकडाऊन करून कोरोना रोखता येणार नाही ती वेळ आता निघून गेली आहे. आपण यापूर्वीच तो उपाय केला आहे. अनेकवेळा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार सर्वत्र झालेला आहे. यामुळे दुकाने बंद ठेवून उपयोग होणार नाही. यावर प्रत्येक नागरिक आणि व्यापारी यांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. असेही त्या म्हणाल्या.
तहसील कार्यालयामध्ये व्यापार्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भोज, मेन रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे, प्रसाद शहा बिभीषण खोसे, संजय काकडे, विजय तोरडमल ,संतोष भंडारी महेश जेवरे, स्वप्नील मेहर आदी उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved