विरोधकांची केवळ श्रेय घेण्यासाठी धडपड ; आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरून कोपरगावातील राजकारण तापले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : विरोधकांनी आपल्याला श्रेय मिळणार नसल्यामुळे या पुतळ्याचे अनावरण आजवर होऊ दिले नाही व पुन्हा एकदा श्रेय वादासाठी पुतळ्याचे अनावरण होवू नये यासाठी प्रसार माध्यमांमध्ये चुकीचे वक्तव्य करून या सोहळयाच्या कार्यक्रमाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत .

मात्र ज्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु आहे त्यांनी कितीही विरोध केला तरी पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत आणि ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सध्या राज्यात विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यामुळे आतापासूनच वातारण तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोपरगावात विधानसभेपूर्वीच वातारण तापले आहे, त्यामुळे आगामी काळात या तालुक्यात राजकीय पुढारी काय भूमिका घेतात याकडे सर्वसामन्यांचे लक्ष लागले आहे.

नितीन साबळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रतिनिधी या नात्याने आ. आशुतोष काळे उपस्थित राहणार आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने या कार्यक्रमाची सर्व तयारी करण्यात आली आहे.

आतापर्यंत विरोधकांनी आपल्याला श्रेय मिळणार नसल्यामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ दिले नाही व पुन्हा एकदा श्रेय वादासाठी पुतळ्याचे अनावरण होवू नये यासाठी प्रसार माध्यमांमध्ये चुकीचे वक्तव्य करून या सोहळयाच्या कार्यक्रमाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत .

मात्र ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं, ज्यांनी आपल्याला एवढे मोठे साहित्य भांडार दिले. ज्यांच्या साहित्याचा परदेशात अभ्यास सुरु आहे अशा महान व्यक्तीच्या पुतळा अनावरणात श्रेय घेण्यासाठी वाद निर्माण करणे हे कोणाही अण्णाभाऊ साठे प्रेमींना व समाजाला आवडणार नाही.

आजवर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी संघटना कार्यकर्ते यांनी उपोषण केली, आंदोलन केली, मोर्चे निघाले परंतु अनावरणासाठी यश मिळाले नाही. दोन दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे व इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना आ. आशुतोष काळे व माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी ग्वाही देवून पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून विरोधकांनी श्रेय घेण्यासाठी कितीही विरोध केला तरी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणारच. असे देखील साबळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe