विरोधकांना सर्वात जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबवल्याचे झाले

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- नगर करदात्यांच्या पैशातून त्यांनाच सोयीसुविधा पुरवताना काम दर्जेदार होणे महत्त्वाचे असते. दुर्दैवाने विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणाऱ्या मलिद्याचीच चिंता असते.

तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्व प्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे.

त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी चुकीचे आरोप करून थयथयाट चालवला आहे, असा आरोप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केला.

मोठा गाजावाजा करून रस्त्याचे उद्घाटन, कामाच्या पाहणीचा फार्स करणारांनी त्याचवेळी आवाज उठवला असता, तर आज रस्ता दर्जेदार झाला असता. परंतु, त्यांच्या दृष्टीला स्वत:च्या वैयक्तिक फायद्यापलीकडे काहीच दिसत नाही.

त्यांचे हे पितळ अवघ्या काही दिवसांतच उघडे पडल्याने आता जनतेचा आवाज बनून कार्यरत असलेल्या शिवसेनेवर केविलवाणे आरोप केले जात आहेत.

शिवसेनेने जनतेच्या आवाजाला वाट करून दिली असून त्यांना जनतेशी देणेघेणेे नसल्याने त्यांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच आहे, अशी टीका माजी महापौर कळमकर यांनी केली आहे.

तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले.

विरोधकांना सर्वात जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबवल्याचे झाले आहेे. लोकांनीही त्यांचा कावेबाजपणा व खाबूगिरीची वृत्ती ओळखली असल्याने आता सारवासारव करण्यासाठी शिवसेनेकडे बोट दाखवले जात आहे, असा टोला कळमकर यांनी लगावला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment