स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राहुरी शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी राहुरी नगरपालिकेच्यावतीने मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 वाजता स्वच्छ भारत व माझी वसुंधरा अभियांन अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रॅली राहुरी नगरपालिका कार्यालयापासून सुरू होऊन स्टेशनरोड नाका नंबर 5 वरून पाण्याची टाकीवरून नगर मनमाड राज्यमार्ग येथून नवी पेठ परत नगरपालिका कार्यालय अशी राहणार आहे.

या रॅलीमध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था सहभागी होणार असून त्यात शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे व नगराध्यक्षा सौ. अनिता पोपळघट यांनी केले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत माझी वसुंधरा हा उपक्रम राबविला जात आहे.

शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यातील एक भाग म्हणून येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राहुरी नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment