रविवारी मातंग समाजाचा निशुल्क डिजिटल वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि.14 फेब्रुवारी रोजी मातंग समाजाचा डिजिटल निशुल्क वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा नागापूर महापालिका जॉगिंग पार्क शेजारी चैतन्य क्लासिक हॉटेल मागे होणार असून, या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दादु नेटके,

सचिव अनिल जगताप, उपाध्यक्ष संजय मंडलिक व मार्गदर्शक भगवान जगताप यांनी केले आहे. हा मेळावा कल्पनाताई शदर काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटन समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते होणार आहे.

तसेच आदर्श केंद्र प्रमुख उत्तमराव शेलार सरांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा समाज व संस्थेच्या वतीने सन्मान केला जाणार आहे. या वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी डिजीटल पध्दतीने ऑनलाईन नोंदणी सुरु आहे.

या मेळाव्यात संपुर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजबांधव सहभागी होणार असून, त्यांची सर्व व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या मेळाव्यात वधु-वर आणि पालक उपस्थित राहणार आहेत.

आधिक माहितीसाठी दादु नेटके मो.नं. 9272513071 व अनिल जगताप 9922714353 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe