अन्यथा सरकारच्या विरोधात कोर्टात जावे लागेल – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शिर्डीचे साई मंदिर खुलं करावं, अन्यथा सरकारच्या विरोधात कोर्टात जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रवरा कारखान्यावर विखे कुटुंबाने श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. राज्य खुलं होत असताना मंदिर बंद असल्यामुळे विखे पिता-पुत्रांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार सर्व काही सुरू करत आहे.

मॉल उघडत आहेत, व्यवसायही सुरू झाले. त्यामुळे आता मंदिरे बंद ठेवणं योग्य नाही. मंदिरे उघडल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागेल आणि परिसरातील लोकांच्या हाताला पुन्हा काम मिळेल, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment