कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या ठेकेदारांना थकित देयके त्वरीत द्यावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महापालिकेकडून सन 2017-18 मधील विविध विकास कामाचे देयके मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महानगरपालिका ठेकेदार संघटनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

देयके मिळण्यासाठी ठेकेदार संघटनेच्या पदाधिकारी यांनी पाठपुरावा करुन देखील अनेक वेळा सविस्तर चर्चा होऊनही मनपा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ठेकेदार संघटनेचे शहानवाज शेख,

मोसिन शेख, सचिन सापटे, सचिन गाले, शोहेब शेख, मुज्जू कुरेशी, संजू डुकरे आदी उपस्थित होते. अहमदनगर महानगरपालिकेचे ठेकेदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यापूर्वी आयुक्त यांना थकित देयके मिळण्यासाठी दोन वेळेस निवेदन दिले होते. तरी देखील कुठल्याही प्रकारचे देयके अद्यापि मिळाले नाही.

नगर शहरामध्ये विविध विकास कामे ठेकेदारांनी सन 2017-18 या आर्थिक वर्षात पुर्ण केले आहे. या कामाची बीले लेखा विभागाकडे जमा आहेत. नगरसेवक निधी सन 2016- 17 या आर्थिक वर्षात सर्व कामाची देयके ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सन 2017-18 या चालू आर्थिक वर्षात नगरसेवक स्वच्छ निधीचा पूर्वी ठराव झाल्याप्रमाणे देयके दिले जात नाही.

तसेच इतर लेखक शीर्षका अंतर्गत सर्व देयके मिळण्यासाठी अनेक वेळा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सविस्तर चर्चा केली होती. यावर तात्काळ देयक देण्याबाबत मनपा प्रशासनाकडून आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सध्याच्या कोरोना संकटकाळात ठेकेदार आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना उदरनिर्वाहासाठी इतर साधन नाही. ते पुर्णत: ठेकेदारीवर अवलंबून असून, ठेकेदारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लाईट बील, दैनंदिन खर्च भागवणे कठिण झाले आहे.

या संकटकाळात ठेकेदारांनी सोनेतारण व बँकेचे कर्ज घेतले असून, त्याचे हप्ते देखील भरणे अवघड झाले आहे. तरी महापालिकेकडून ठेकेदारांचे थकित देयके त्वरीत मिळण्याची मागणी अहमदनगर महानगरपालिका ठेकेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment