Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण ठरली. आपल्याला माहित आहे की,पारनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके तर महायुतीकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात होते.
झालेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळाली व अखेर पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ दाते यांनी विजय मिळवला. या मतदारसंघांमध्ये विविध मुद्दे गाजले तसेच एका घरात दोन पदे नको हा देखील एक मुद्दा महत्त्वाचा होता व या सगळ्या दृष्टिकोनातून काशिनाथ दाते यांचा विजय हा तितकाच महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी सोमवारी मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली व त्यावेळी विखे पाटील यांनी आमदार काशिनाथ दाते यांना पेढे भरवले व शुभेच्छा दिल्या व तसेच काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य देखील केले.
पारनेर आता चांगल्या माणसाच्या हातात- पालकमंत्री विखे पाटील
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली व यावेळी विखे पाटील यांनी त्यांना पेढे भरवले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, पारनेर तालुका आता चांगल्या माणसाच्या हातात आल्यामुळे निश्चितच या ठिकाणी विकास होणार असून तो विकास करण्याकरिता आम्ही दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिली.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की दाते यांनी जो काही पारनेर मतदारसंघातून विजय मिळवला तो देखील एक अविस्मरणीय असा आहे. हे भेटी प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड,
अहिल्यानगर जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुभाष दुधाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना विखे पाटील यांनी म्हटले की, पारनेर तालुक्यावर विखे कुटुंबाचे विशेष प्रेम आहे व या तालुक्याचा विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध असून दाते यांच्या माध्यमातून आता तालुक्यात विकास कामांना भरीव निधी देणार आहे
व सुपा येथे एमआयडीसीच्या माध्यमातून मतदारसंघातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच पारनेर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्याकरिता आता येणाऱ्या काळात प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे देखील विखे पाटील यांनी या निमित्ताने नमूद केले.