अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.
पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. काल (शुक्रवार) तालुक्यातील १५ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडेचारशेच्या जवळ पोहोचला आहे.
या १५ रुग्णामध्ये ढोकी ३, राळेगण सिद्धी २, गोरेगाव २, डिसकळ २, सारोळा अडवाई १, निघोज १, पारनेर शहर १, कासारे १, बुगेवाडी १, सुपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.
या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ढोकी हे गाव ३ दिवस तर राळेगण सिद्धी गाव १४ दिवस बंद करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात १२ हजार २६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
त्यापैकी ८ हजार ९९३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. सध्या ३ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५३ मृत्यू झाले आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved