पारनेरचा ‘नायक’ अनंतात विलीन

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनचे भूमिपुत्र नायक भरत लक्ष्मण कदम यांचे आसाम येथील तेजपूर येथे कर्तव्य बजावत असताना प्रशिक्षणाच्या दरम्यान निधन झाले. कदम यांच्यावर रविवारी सकाळी 11 वाजता मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद माजी सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, गांजीभोयरेचे सरपंच डॉ.आबासाहेब खोडदे, लहू थोरात आदी उपस्थित होते.

शुक्रवारी आसाम येथील तेजपूर येथे सकाळी मॉर्निंग बिपिटी प्रशिक्षण सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने नायक भरत कदम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव शासकीय विमानाने आसामवरून दिल्ली व दिल्ली वरून पुण्यात आणण्यात आले.

त्यानंतर पुण्यावरून रुग्णवाहिकामधून त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी पिंपरी जलसेन येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात पिंपरी जलसेन येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या नायक भरत कदम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवा केली आहे. नायक भरत कदम यांच्या माध्यमातून भारत भूमिचा एक भरत तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार ज्योती देवरे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News