सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातुन सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले डॉ. किरण मुळे यांनी पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत काम करून भरभक्कम पैसे कमावण्याची संधी असताना,
आपल्या क्षेत्रात कठोर अभ्यास आणि प्रॅक्टिस करून आपल्या जन्मभूमीलाच आपली कर्मभूमी बनवत आता पर्यंत ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना कर्करोगापासून वाचवण्याचे काम केले आहे. डॉ. मुळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले.
त्यांनतर एम.बी.बी.एस. ची पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद मध्ये पूर्ण करत, एम.एस. ची पदवी दिल्लीला पूर्ण केली. आणि जे उपचार मोठ्या शहरांमध्ये भरघोस पैसे खर्च करून होतात,
तेच उपचार ग्रामीण भागातील लोकांना अल्प दरात देण्याच्या उद्देशाने त्यांनी औरंगाबादमध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला. सध्या औंरंगाबादमधील सेठ नंदलाल धुत हॉस्पिटलमध्ये ओन्को सर्जन म्हणून कार्यरत असलेले डॉ. मुळे यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर व रुग्णांबद्दल असणाऱ्या आपुलकी व सामाजिक भावामुळे, किचकट शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचारांसाठी रुग्णांमध्ये प्रसिध्दी कमावली आहे.
दरम्यान डॉ. मुळे यांनी अशाच एका रुग्णावर Total Thyroidectomy आणि Central Neck Dissection ची किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली, रुग्णाच्या व नातेवाईकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व आप्तेष्टांनी आनंदाने डॉ. मुळे यांचे आभार मानले. हायटेक फौंडेशन सेवाभावी संस्थे मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तरोत्तर त्यांचा हातून अशीच समाजसेवा घडत राहो.
“माझ्यासाठी रुग्णसेवा केवळ व्यवसाय नसून, ते माझे सामाजिक कर्तव्य व नैतिक जबाबदारी आहे. मी सर्व मार्गांनी रुग्णांची मदत करत राहील. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.”
– डॉ. किरण मुळे