आंतरजातीय विवाह केल्याने छळ; तरुणीची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरात लालतारा हौसिंग सोसायटी येथे सासरी नांदत असलेली विवाहीत तरूणी वैष्णवी राहुल घोडेकर, (वय- २१) हिला सासरच्या लोकांनी तू तुझ्या आईवडीलांकडून ३० हजार रूपये घेवुन ये अशी वेळोवेळी पैशांची मागणी करून ते पैसे न आणल्याने नवरा तसेच सासू- सासरे यांनी शारिरीक व मानसिक छळ करून पैशांची मागणी केली.

वैष्णवी हिने आंतरजातीय विवाह केला असल्याने तो सासु- सासरे यांना मान्य नव्हता. या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करून तिला मानसिक त्रास देण्यात आला.

या त्रासास कंटाळून वैष्णवी राहुल घोडेकर या तरूणीने आत्महत्या केली. याप्रकरणी दिलीप रमेश श्रीराम, (धंदा -खासगी नोकरी, रा. लालतारा हौसिंग सोसायटी, संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा राहुल पांडूरंग घोडेकर,

सासरा पांडूरंग नामदेव घोडेकर, सासू कांताबाई पांडूरंग घोडेकर (सर्व रा. लालतारा होसिंग सोसायटी, संगमनेर) यांच्याविरूद्ध संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डिवायएसपी मदने, पोनि देशमुख यांनी भेट दिली असून सपोनि साबळे हे पुढील तपास करीत आहेत.

सुरूवातीला पोलिसांत आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत वैष्णवी हिच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून नवरा, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment