अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पणन संचालकांची परवानगी न घेता श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकऱ्यांनी काही कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट दिल्याची तक्रार संचालक सचिन गुजर यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र, या कालावधीत त्यांनी आपल्या मर्जीतील काही व्यापाऱ्यांना बाजार समितीची मोक्याची जागा दिली.

बाजार समितीच्या जागांची परस्पर अशा प्रकारे विल्हेवाट लावण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यासाठी पणन संचालकांची परवानगी आवश्यक आहे.
मात्र, तसे करण्यात आले नाही. या जागेचे हस्तांतरण थांबवावे, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सहायक निबंधक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved