गुटखा तस्करांवर पोलिसांची कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा तस्करीवर पोलिसांकडून कारवाईचे धाडसत्र सुरूच आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील जिजामाता चौक परिसरातील एका घरात अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने छापा टाकून 48 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समजलेली अधिक माहिती अशी कि, अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकास खबर मिळाल्यानुसार त्यांनी आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या पोलीस पथकाच्या सहाय्याने हा छापा टाकला होता.

या छाप्यात 47 हजार 450 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक खराडे हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment