जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; एकास ताब्यात घेतले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नेवासा येथील शिक्षक बँकेच्या पाठीमागे वडारगल्लीत कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर प्रभारी सहायक पोलिस अधीक्षक अभिनय त्यागी यांनी मंगळवारी संध्याकाळी कारवाई केली.

गुप्त बातमीदाराकडून या अड्ड्याबद्दल माहिती समजताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस नाईक सुहास गायकवाड, कॉन्स्टेबल महेश कचे, जी. एल. इथापे यांनी घटनास्थळी धाव घेताच मटका खेळणारे पळून गेले.

जुगाराचे आकडे घेणारा लक्ष्मण काशिनाथ लष्करे (वय ५५) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून मटका, जुगाराचे साहित्य ताब्यात घेत रोख रक्कम १२३० रुपये हस्तगत करण्यात आली.

त्याने हा धंदा मी किशोर तट्टू (नेवासे बुद्रूक) याला देत असल्याची माहिती पोलिसांना दिली. बुकी किशोर तट्टू व पंटर लष्करेवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News