दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नुकतेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

हि घटना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीबाबत संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती मिळाली.

यानुसार पोलीस अधिकारी यांनी पथकाला पाचारण करण्यात आले. संगमनेर तांबे हॉस्पीटल ते गुंजाळवाडी रोडवर हॉटेल रानजाईजवळ नाशिक पुणे हायवे येथील बोगद्यात अंधारात पांढरया रंगाच्या कारमध्ये पाच जण हे दबा धरून बसले होते.

पोलीस आल्याचे समजताच हे शेतात पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी मोठ्या शिथापीने तिघा जणांना पकडले मात्र दोघे जण हे पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी असिफ अन्सार पठाण वय ३१ रा. नाईकवाडपुरा, भूषण बंडू थोरात रा. घुलेवाडी, तन्वीर कादिर शेख रा. दिल्ली नाका या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अमोल जोंधळे रा. गुंजाळवाडी आणि बबलू रा. संगमनेर हे दोघे जण पसार झाले आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादिवारीन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत क्रेटा कार, मोबाईल, हातोडी, दोरी,

मिरची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यांच्याकडून एकूण ८ लाख ८० हजार २६० रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment