अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-लुटमारीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहे. चोरट्यांच्या भीतीने घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. नुकतेच चोरटयांनी एका जोडप्याला लुटल्याची घटना घडली होती.
दरम्यान या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश ऊर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 10 डिसेंबर रोजी चंदुलाल पठाण व त्यांच्या पत्नी झुलेखा चंदुलाल पठाण (रा. अंतरवाली ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे पती-पत्नी त्यांच्या दुचाकीवरून खर्डा ते जामखेड रोडवरून जात असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी पठाण यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली.
पठाण दांपत्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखविला व त्यांच्या जवळील सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी झुलेखा पठाण यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारांमार्फत हि चोरी वरील आरोपींनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ आरोपींना अटक केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com