अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-आपल्या विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे या ५५ वर्षीय वृद्धावर तलवार, काठी तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डिले.
याच्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा ता. शिरूर, जि. पुणे शिवारात मुसक्या आवळल्या.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत गुन्हेगार अमोल कर्डिले याचा चुलता अनिल कर्डिले याच्या विरोधात जयवंत नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर तो मागे घ्यावा यासाठी अमोल व त्याचे साथीदार जयवंत नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. मतमोजणीत अनिल कर्डिले विजयी झाला तर जयवंत नरवडे पराभूत झाले.
निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी अमोल कर्डिले हा इतर साथीदारांना घेऊन जयवंत नरवडे यांच्या घरी गेला. त्यांना घरातून बाहेर ओढून शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी, काठीने मारहाण करत अमोल कर्डिले याने जयवंत यांच्यावर तलवारीने हल्ला केला. नरवडे यांची सुन मध्यस्ती करण्यासाठी आली असता अविनाश निलेश कर्डिले याने कमरेचे पिस्तुल काढून गोळया घालण्याची धमकी दिली.
तलवारीचे वार झाल्यानंतर रक्तभंबाळ झालेले नरवडे निपचित पडले त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले. घटना घडली त्याच दिवशी आकाश कर्डिले व रमेश नरवडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातून विवेक उर्फ पिट्या कर्डिलेसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.
मुख्य आरोपी अमोल कर्डिले, अनिल कर्डिले यांच्यासह इतर आरोपी फरार असल्याने पोलिस त्यांच्या मागावर होते. अमोल कर्डिले हा शिरूर तालुक्यातील गोलेगाव, निमोणे भागात असल्याची माहीती समल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे, दत्ता चौगुले हे त्याचा शोध घेत होते.
अमोलसह इतर आरोपीही शिरूर भागात असल्याची खबर पोलिसांना होती. आरोपींचा शोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अमोल कर्डिले हा चव्हाणवाडी फाटा (निमोणे ता. शिरूर, जि. पुणे) आरोपींचा शोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अमोल कर्डिले हा चव्हाणवाडी फाटा (निमोणे ता. शिरूर, जि. पुणे) शिवारात कोल्हे यांच्या शेतामध्ये दारू व मटण पार्टी करीत असल्याची
माहीती पुढे आली. पथकाने चव्हाणवाडी फाटा शिवारात जात कोल्हे यांच्या शेतात शोध सुरू केला असता उसाचा फड व डाळींब बागेच्या मध्ये लाल रंगाची कार उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथक तेथे पोहचले त्यावेळी अमोल व त्याचा मित्र मयुर याच्यासोबत मटण व दारूच्या पार्टीमध्ये रमला होता.
पोलिस पाहताच डाळींबाच्या बागेत तो सैरावैरा पळू लागला. पोलिस त्याचा पाठलाग करीत असतानाही तो तेथून सटकण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर निरीक्षक बळप यांनी फायर करण्याचा इशारा दिल्यानंतर अमोल पोलिसांना शरण आला. अमोल यास पारनेर येथे आणून त्याची अटकेची कारवाई पूर्ण केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved