अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई शहरातील ताराकपूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ नोव्हेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याना गोपनिय माहीती मिळाली कि,
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/11/image-7.png)
शिरपूर जि.धुळे येथून दोन इसम अहमदनगर येथे बेकायदेशीर गावठी कट्टे आणि काडतूसे विक्री करीता घेवून येणार आहे. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपुर,
अ.नगर येथे सापळा लावला व या दोघा संशयीत इसमांना ताब्यात घेतले. हे दोघे तारकपूर बस स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत होते.
त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. चुन्नीलाल सुभाराम पावरा वय-२१ रा.हिवरखेडा,ता.शिरपूर जि.धूळे व दिलीप जयसिंग पावरा वय-२० रा.अंबा ता.शिरपूर जि.धूळे असे आरोपींची नावे आहेत.
दोघांची पोसई गणेश इंगळे यांनी अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ६०,४००/-रु. किमतीचे देशी बनावटीचे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आल्याने तो जागीच जप्त करण्यात आला. तसेच दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved